आज तालुक्यात 95 रुग्ण कोरोनामुक्त तर 96 नवीन रुग्ण आढळलेत

उमरी ठरतोय हॉटस्पॉट, 2 मे ला 31 रुग्ण आढळल्यानंतर आज आणखी 17 रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: दोन दिवस तालुक्यात कोरोनाचे रेकॉर्डब्रेक द्विशतकी रुग्ण आल्यानंतर आज गुरुवारी दिनांक 6 मे रोजी काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आज तालुक्यात 96 पॉझिटिव्ह आढळलेत. यात वणी शहरातील 31 रुग्ण तर ग्रामीण भागातील 53 रुग्ण आहेत. यात एकट्या उमरी येथील 17 रुग्ण आहेत. 2 मेला उमरी येथे तब्बल 31 रुग्ण आढळल्यानंतर आज आणखी 17 रुग्ण आढळलेत. आज इतर ठिकाणचे 4 रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आज 95 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याशिवाय आज यवतमाळ येथे 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात शासकीय महाविद्यालयात एका 65 वर्षीय पुरुष, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल येथे एका 65 वर्षीय महिला तर खासगी रुग्णालयात एका 31 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

वणी शहरात रवीनगर येथे सर्वाधिक 4 रुग्ण तर प्रगतीनगर 3, शिवाजी चौक 3, जैन लेआउट 2, गुरु नगर 2, सर्वोदय चौक 2, सुदर्शन रेसिडेन्सी, कनकवाडी, गाडगे बाबा चौक, भोंगाडे लेआउट, गुलमार्क पार्क, हिराणी लेआऊट, समृद्धी अपार्टमेंट, रंगनाथ चौक, देशमुखवाडी, काळे लेआउट, भीम नगर, टागोर चौक, ढुमेनगर, विठ्ठलवाडी, आवारी ले आउट येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

आज उमरी येथे सर्वाधिक 17 रुग्ण आढळलेत. याशिवाय घोन्सा येथे 8 रुग्ण, चिखलगाव येथे 4, साखरा, कायर येथे प्रत्येकी 3, गणेशपूर, राजूर इजारा, पुनवट, नायगाव, वाघदरा येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळलेत. तर भालर टाउनशिप, उकणी, सावर्ला, मारेगाव कोरंबी, मजरा, रासा, सुंदरनगर, मोहुर्ली, कुंभारखणी, निवली, नायगाव, शिवणी, वांजरी, शिरपूर, वारगाव, बोरगाव, पुरड येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 3 तर झरी तालुक्यातील 1 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 247 अहवाल प्राप्त झालेत. यात 43 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. याशिवाय आज 345 व्यक्तींची रॅपिड ऍन्टीजन टेस्ट घेण्यात आली. यात 53 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. आज आलेल्या रुग्णांवरून 250 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे पाठवण्यात आले आहे. अद्याप 479 व्यक्तींचे रिपोर्ट यवतमाळहून येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 1060 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 79 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 946 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 35 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4068 रुग्ण आढळून आलेत. यातील 2946 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 62 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हे देखील वाचा:

वणीतील ग्रामीण रुग्णालयात लोकांची जत्रा, पहाटे 4 वाजेपासून लसीसाठी रांगा

प्रतिबंधीत बियाणांची विक्री करणारा गजाआड

Leave A Reply

Your email address will not be published.