आज तालुक्यात 64 पॉझिटिव्ह तर 97 रुग्णांची कोरोनावर मात

रुग्णसंख्येत सातत्याने घट होण्यास सुरूवात

0

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचे 64 रुग्ण आढळलेत तर 97 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 27 पॉझिटिव्ह आढळलेत तर ग्रामीण भागात 29 पॉझिटिव्ह आढळलेत. तर 8 रुग्ण इतर ठिकाणांचे आहे. सध्या तालुक्यात 760 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 5 दिवसांमध्ये सुमारे 650 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान यवतमाळ येथे उपचारादरम्यान तालुक्यातील 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यात वणी येथील 73 वर्षीय पुरुषाचा शासकीय महाविद्यालय तर एका 52 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

वणी शहरात आलेल्या 29 रुग्णांमध्ये रंगारीपुरा येथे 4 रुग्ण, विठ्ठलवाडी, प्रगतीनगर येथे प्रत्येकी 3 रुग्ण, गुरुनगर येथे 2 रुग्ण तर रविनगर, टागोर चौक, वसंत गंगा विहार, पठारपुरा, ब्राह्मणी रोड, वासेकर ले आऊट, आनंद नगर, जैन ले आऊट, विराणी हॉल, भोंगळे ले आऊट, नटराज चौक, राम शेवाळकर परिसर, भारत माता चौक, भगतसिंग चौक, झेडपी कॉलनी, मनिष नगर व रामपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

तर ग्रामीण भागांत आलेल्या 27 रुग्णांमध्ये राजूर, पुनवट येथे प्रत्येकी 3 रुग्ण आढळलेत. सावर्ला, नवरगाव, मेंढोली येथे प्रत्येकी 2 रुग्ण तर चिखलगाव, गणेशपूर, वागदरा, निळापूर, मंदर, येनक, माथोली, लालगुडा, भालर टाऊनशीप, बोर्डा, वरझडी, शिंदोला, शिरपूर, कृष्णानपूर, वांजरी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर झरी व मारेगाव तालुक्यातील प्रत्येकी 8 रुग्ण वणी येथे पॉझिटिव्ह आला आहे.

आज यवतमाळ येथून 172 अहवाल प्राप्त झालेत. यात 28 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 394 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 36 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 585 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 787 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 760 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 64 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 632 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 64 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4545 रुग्ण आढळून आलेत. यातील 3712 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 73 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.

पेडिंग अहवालाच्या आकडेवारीबाबत घोळ की नजरचुकी?
शासकीय आकडेवारीनुसार काल मंगळवारी आरटीपीसीआर टेस्टचे 959 अहवाल यवतमाळहून येणे बाकी होते. आज 172 अहवाल यवतमाळहून प्राप्त झाले. त्यामुळे 787 अहवाल अप्राप्त होते. आज 585 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. ही आकडेवारी आजच्या अप्राप्त अहवालात टाकणे गरजेचे असताना त्याचा यात समावेश करण्यात आलेला नाही. अप्राप्त अहवालाची आकडेवारी 1472 होत आहे. पण या आकडेवारीचा आजच्या अप्राप्त अहवालात समावेशच नाही. त्यामुळे अप्राप्त अहवालाबाबत आकडेवारी लपवण्यात येत आहे की ही नजरचुकी आहे असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान याबाबत आरोग्य प्रशासनास संपर्क साधला असता त्यांनी आज 585 व्यक्तींचे स्वॅब घेतले मात्र ते पाठवले नसल्याची माहिती दिली. त्यामुळे इथे नेमके काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही. एकीकडे अधिकाधिक टेस्टींग करून आरोग्य प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. मात्र जर संशयीतांचे स्वॅब घेऊन ते पाठवण्यात येत नसेल तर ही गंभीर बाब आहे.

हे देखील वाचा:

डॉक्टर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांचेही कोरोनाने निधन

चार दिवसांत 470 लोकांची जाग्यावरच कोरोना टेस्ट

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.