मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

तालुक्यात दोन दिवसांचा हाय अलर्ट, दक्षता घेण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे अचानक असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने काही दुकानदार व घरांचे छप्पर उडाले तर इलेक्टिक पोलवरील तार तुटून खाली पडले. यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले तर 6 तास जनतेला अंधारात रहावे लागले. दरम्यान उद्या आणि परवा विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.

14 मे रोज सायंकाळी साडे 4 ते 5 च्या दरम्यान अचानक वादळी वारा सुटला व जोरदार पावसाला सुरवात झाली. अर्धा तास जोरदार पाऊस पडला व तुफान वाऱ्यामुळे मुख्य मार्गावरील जाही व्यापारी यांच्या दुकानावरील टिनपत्रे उडून रस्त्यावर पडले. विद्युत खांबावरील अनेक ठिकाणी तार तुटून पडले त्यामुळे थोड्या प्रमाणात नुकसान झाले. ग्रामपंचायत सदस्य गणेश आसुटकर यांच्या घरावरील सुद्धा छपर उडाले.

विशेष म्हणजे हा पाऊस फक्त मुकुटबन मधेच पडला इतर खेडे विभागात थेंबबर सुद्धा पाणी आलं नाही. मात्र आभाळ काळ्या धगांनी व्यापले होते. वादळी पावसामुळे मुकुटबन गावातील अनेक ठिकाणचे विद्युत तार तुटल्याने गावातील विद्युत पुरवठा 6 तास बंद होता. वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व तुटलेली तार जोडून विद्युत पुरवठा सुरू केला.

उद्या आणि परवा हाय अलर्ट
रविवार आणि सोमवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

विजेच्या कडकडाटासह पाऊस आल्यास काय करावे?
घराबाहेर असल्यास:- सुरक्षित निवाऱ्याच्या ठिकाणीकडे (मजबूत इमारतीकडे )प्रस्तान करावे, ट्रॅक्टर शेतीची अवजारे मोटर सायकल, सायकल यांच्या पासून दूर राहणे, गाडी चालवत असल्यास सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा, उघड्यावर असल्यास, शेवटचा पर्याय म्हणून लगेच गुढग्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व डोके दोन्ही गुडघ्याच्या मध्ये तोंड झाकावे, जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा,मोकळ्या तसेच लटकत्या विद्युत तारेपासून दूर रहा,

जंगलामध्ये असल्यास: लहान झाडाखाली, उताराच्या जागेवर निवारा घ्यावे, इतर खुल्या जागेवर, दारीसारख्या खोल जागेवर जाण्याचा प्रयत्न करा. वीज पडल्यास/ वाज्रघात झाल्यास त्वरित रुग्ण वाहिक व वैद्यकीय मदत बोलवा, वाज्रघात बाधित व्यक्तीस त्वरित वैद्यकीय मदत मिळवून घ्या, त्याला हात लावण्यास धोका नसतो, ओल्या व थंडया परिस्थितीत बाधित व्यक्ती व जमीनीच्या मध्ये सरक्षणात्मक थर ठेवावा जेणेकरून हायकोथर्मीयाचा शरीराचे अतिकमी तापमान धोका कमी होईल .

इजा झाल्यास:– स्वसन बंद असल्यास — तोंडावाटे पुनरुत्थान ( mouth- to mouth) प्रक्रिया अवलंबवावी. हृदयचे ठोके बंद असल्यास- कुठलीही वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाची हृदय गती cpr करून सुरू ठेवा.

काय करू नये: गडगडाटीचे वादळ आल्यास, उंच जागेवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, स्वतंत्र झाडे, रेल्वे, बस, शेळीचे आश्रय स्थाने, दळण वळणाची टॉवर्स, ध्वजाचे खांब,विद्युत/ दिव्याचे खांब, धातूचे कुंपण, उघडी वाहने, पाणी इत्यादि टाळावे.

घरात असल्यास काय करावे: वायरद्वारे जोडले गेलेले फोन मोबाईल व इतर इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक उपकरने विद्युत जोडणीस लावू नये, या दरम्यान आंघोळ करू नये, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे करू नये, काँक्रीटच्या (ठोस) जमिनीवर झोपू नये किया उभे राहू नये, प्रवाहकीय पृष्ठभागासी संपर्क टाळावा,

घराबाहेर असतांना:– मेघगर्जनेच्या वेळी वीज चमकत असतांना किंवा वादळी वारे वाहयमत असतांना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये, वाहनांच्या धातू किंवा विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, अधांतरी लटकणार्या/ लोम्बणार्या तार (केबल) पासून लांब राहणे ज्यामुळे नागरिकांना आपके जीव नैसर्गिक विजेपासून होणारे मृत्यू टाळता येते. वरील माहितीच्या आधारे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आपला जीव नैसगिर्क विजेपासून होणारा मृत्यू टाळू शकतो. तरी तालुक्यातील सर्व जनतेनी वरील माहितीच्या आधारे आपले प्राण वाचवावे असे आवाहन प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.