वणीत रुग्णसंख्या झपाट्याने खाली, आज अवघे 4 पॉझिटिव्ह

आज तालुक्यात 35 रुग्ण, कृष्णानपूरमध्ये 11 पॉझिटिव्ह

0

जब्बार चीनी, वणी: वणी येथे कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस कमी होत आहे. यात मुख्यत: वणी शहरातील रुग्णसंख्येचा दर झपाट्याने कमी होत आहे. आज शनिवारी दिनांक 15 मे रोजी तालुक्यात अवघे 35 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे वणी शहरात कोरोनाचे थैमान कमी होताना दिसत आहे. काल वणी शहरात 16 रुग्ण आढळल्यानंतर आज अवघे 4 रुग्ण आढळले. दिवसेंदिवस शहरात रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होण्याचा दर कमी दिसून येत आहे. आज ग्रामीण भागात 25 रुग्ण आढळलेत. यातील एकट्या कृष्णानपूर या गावात 11 पॉझिटिव्ह आले आहेत. 6 रुग्ण इतर ठिकाणचे आहेत. दरम्यान आज 132 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या देखील दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. दरम्यान रविवारपासून कृषीकेंद्र दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

वणी शहरात आलेल्या 4 जैन ले आऊट, हिरानी ले आऊट, कनकवाडी व रंगारीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 25 रुग्णांमध्ये कृष्णानपूर येथे सर्वाधिक 11 रुग्ण आढळलेत. मोहदा येथे 2 रुग्ण तर नवेगाव, मुर्धोनी, चिलई, केशव नगर, शिरपूर, चिखलगाव, गणेशपूर, बाबापूर, वांजरी, पळसोनी, निंबाळा, नायगाव (खु) येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला. याशिवाय मारेगाव तालुक्यातील 2 तर झरी तालुक्यातील 4 व्यक्ती वणीत पॉझिटिव्ह आले.

आज यवतमाळ येथून 374 अहवाल प्राप्त झालेत. यात 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 234 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 20 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 622 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 1559 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 666 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 76 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 510 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 80 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 4727 रुग्ण आढळून आलेत. यातील 3983 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 78 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.

हे देखील वाचा:

मुकुटबन येथे वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे नुकसान

महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

 

Leave A Reply

Your email address will not be published.