हिवरीचे सरपंच नंदूकुमार बोबडे यांचे निधन

सच्चा कार्यकर्ता हरपल्याने गाव बुडाले शोकसागरात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील हिवरी ग्राम पंचायतचे सरपंच नंदूकुमार विठ्ठल बोबडे (52) यांचे शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने हिवरीत गावात शोककळा पसरली आहे.

काही नंदूकुमार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे मागे पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.

सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी गावात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. अनेक लोकांच्या समस्या त्यांनी मार्गी लावल्या. त्यांनी आपल्या सामाजिक कार्या मुळे परिसरात आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने गावातील सच्चा सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

वणीकरांसाठी ‘वरदान’ ठरणार जुनाडा ओव्हरब्रीज

तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.