जब्बार चीनी, वणी: आज मंगळवारी तालुक्यात कोरोनाचे 30 रुग्ण आढळलेत. यात शहरातील 1 रुग्ण तर ग्रामीण भागातील 29 रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये एकट्या कळमणा गावातील 15 रुग्ण आहेत. दरम्यान आज 59 व्यक्तींनी कोरोनावर मात केली. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या तालुक्यात ऍक्टिव्ह रुग्णसंखा ही 229 आहे. दिवसेंदिवस ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून वणी शहरात अवघे 1 रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
आज वणीत भगतसिंग चौक येथे 1 रुग्ण आढळला आहे. तर ग्रामीण भागात आलेल्या 29 रुग्णांमध्ये कळमना येथे 15 रुग्ण, ब्राह्मणी येथे 3, सुकनेगाव व उकणी येथे प्रत्येकी 2 तर पद्मावती नगरी लालगुडा, शिंदोला, वांजरी, चिखलगाव, रासा, कोलार पिंपरी, राजूर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
आज यवतमाळ येथून 457 अहवाल प्राप्त झालेत. यात 25 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय आज 114 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 5 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णावरून 391 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 633 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 229 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 25 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 162 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 42 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5179 रुग्ण आढळून आलेत. यातील 4865 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 85 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: