नागेश रायपुरे, मारेगाव: आज मंगळवारी दिनांक 25 मे रोजी तालुक्यात 29 पॉझिटिव्ह आढळले आहे. यात 16 पुरुषा सह 13 महिलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील असून मारेगाव शहरातील एका 60 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील 7 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आरोग्य विभागाने 222 व्यक्तींची रॅपीड ऍन्टिजन टेस्ट केली असता त्यात केवळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तर आज 803 व्यक्तींचे आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट यवतमाळ वरून प्राप्त झाले. यात 28 पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण 29 पॉझिटिव्ह आज तालुक्यात आढळलेत. हे सर्व ग्रामीण भागातील रहिवाशी आहेत.
तालुक्यात सध्या 188 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यात कोविड सेंटरवर 31 रुग्ण उपचार घेत आहे तर 145 होम आयसोलेट आहे. डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर 7 तर 5 रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
शहरातील रुग्णसंख्येत सातत्याने घट
सध्या वणी प्रमाणेच मारेगाव शहरातही रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे तर दुसरीकडे गावागावांमध्ये टेस्ट कॅम्प होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक दिसून येत आहे. मात्र टेस्ट वाढवल्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत होत आहे.
हे देखील वाचा: