जब्बार चीनी, वणी: आजही शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मंगळवारी दिनांक 1 जून रोजी तालुक्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळले. यात येनक येथील 1 रुग्ण तर चनाखा येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना सुटी देण्यात आली. सध्या तालुक्यात 89 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल सुरू आहे. वणीतील रुग्णसंख्येचे प्रमाण खूपच कमी झाले आहे तर ग्रामीण भागात काही प्रमाणात रुग्ण आहेत. मात्र कोरोनामुळे मृत्यू सारखे सुरू आहे. मृत्यू दरात घट असली तरी देखील मृत्यू सारखे सुरू आहे. आज देखील एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज यवतमाळ येथून 80 रिपोर्ट आले, यात 2 व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यात. तर आज 141 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात अवघा एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली. आज आलेल्या रुग्णावरून 33 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 147 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.
सध्या तालुक्यात कोरोनाचे 89 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 13 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 62 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 14 रुग्णांवर यवळमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 5227 रुग्ण आढळून आलेत. यातील 5045 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 93 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)
हे देखील वाचा: