एकल दुकानामुळे उडाला गोंधळ, एकल दुकाने म्हणजे काय?

उद्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधले दुकाने सुरू होणार का?

0

जब्बार चीनी, वणी: ब्रेक द चेन अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये आजपासून शिथिलता आणण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी आजपासून लॉकडाऊनचे नवीन नियम लागू झालेत. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या बुधवार दिनांक 2 मे पासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार एकल दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र या एकल दुकानाने चांगलाच गोंधळ घातलेला आहे. एकल दुकानाचा नेमका काय अर्थ लावावा हा प्रश्न केवळ वणीतीलच नाही तर राज्यभरात ज्या ठिकाणी मुभा देण्यात आली आहे, तिथे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

जिल्हाधिकारी यांच्या नवीन आदेशाप्रमाणे अत्यावश्यक सेवेत न येणारे मात्र एकल दुकाने (stand alone) जी दुकाने शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा मॉलमध्ये येत नाही, अशी दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहिल, असे म्हटले आहे. वणीमध्ये शॉपिंग मॉल जरी नसला तरी शॉपिंग कॉम्प्लेक्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यात नगर पालिकेच्या काही तर काही खासगी शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी दुकाने सुरु ठेवण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. शिवाय सलून, ब्युटी पार्लर इत्यादी गोष्टी यांचे देखील एकल दुकान आहे. त्यांनी सुरू ठेवावे का? असा ही गोंधळ आहे.

एकल दुकानाचा नेमका अर्थ काय काढायचा?
एकल दुकानावर नागपूर येथे प्रशासकीय अधिका-यांच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेअंती एकल दुकाने म्हणजे मॉल वगळता सर्व दुकाने असा अर्थ काढण्यात आला. मात्र हे दुकाने केवळ खरेदी विक्रीचे असणार यात सलून किंवा ब्युटी पार्लर येणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

उद्यापासून वणीतील दुकाने सुरू होणार आहे. वणीत मोठ्या प्रमाणात शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. त्यांनी दुकाने सुरु ठेवावे की नाही याबाबत व्यावसायिकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. आता कोणत्या दुकानांना मुभा आहे व नाही हे उद्याच कळू शकेल. सध्या तरी जो तो आपापल्या परिने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. जर यात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश नसेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का? हा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. गेल्या अनेक  दिवसांपासून दुकाने बंद असल्याने यामुळे केवळ व्यावसायिकांमध्ये रोष आहे. ग्राहक देखील याला कंटाळले आहे. नवीन निर्णयाचे व्यावसायिकांसह ग्राहकांनी देखील स्वागत केले आहे. 

हे देखील वाचा: 

तालुक्याची कोरोनामुक्ती झपाट्याने वाटचाल, आज 3 रुग्ण

अत्यावश्यक सेवेत नसणा-या एकल दुकानांना परवानगी

तो झाडावर चढल्यावरही वाघाने त्याला ओढून खाली आणले

Leave A Reply

Your email address will not be published.