राजू कांबळे, झरी: झरी पंचायत समिति येथे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार उपस्थितीत पाणी टंचाई बाबत गुरूवारी दिनांक 26 ला आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी टंचाई बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. झरी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची बिकट समस्या आहे. शिवाय मागील वर्षापेक्षा या वर्षी पाऊस हा खुप कमी पडला आहे.
या वर्षी झरी तालुक्यात सरासरी 61.43 मीमी पर्जन्यमान कमी झाले. त्यामुळे मुळे जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू शकते. त्यामुळे पाण्याचे नियोजन व कृती आराखडा तयार करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. झरी तालुक्यातील प्रत्येक गावात पाण्याविषयी काय उपाययोजना करता येईल त्या सदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत झरी पंचायत समिति सभापती लता आत्राम, उप सभापती नागोराव उर्वते, पंचायत समिती सदस्य प्राणीता घुगुल, राजू गोद्रवार, गटविकास अधिकारी चव्हाण, शिवाजी गवई, तहसिलदार व पंचायत समितिचे इतर पधाधिकारी, सर्व सरपंच, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.