उपोषणकर्त्या शेतका-यांची सुकानू समितीने घेतली भेट

0

रवि ढुमणे, वणी: शेतकरी संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणे गरजेचे आहे. परंतु या सरकारचे धोरणच शेतक-यांप्रती पूर्णता उदासीन असल्याचे दिसून येत आहे. असे मत सुकानू समितीचे प्रदेश सदस्य देवानंद पवार यांनी व्यक्त केले. निळापूर येथे पीकविमा अंतर्गत शेतमालाच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतकरी उपोषणाला बसले आहेत.

ब्राह्मणी निळापूर या भागातील जवळपास बहुतांश गावातील शेतक-यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांवर विपरीत परिणाम झाल्याने कपाशीचे बोन्डे गळून पडत आहे. कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई पीक विमा अंतर्गत पीक विमा उतरविणा-या शेतक-यांना मिळावी. तसेच ज्यांनी पीक विमा उतरविला नाही त्यांना ही सरकारने मदत घोषित करावी. इत्यादी मागण्या घेऊन निळापूर, ब्राह्मणी येथे ३० शेतकरी महिला व पुरुषांनी मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण छेडले आहे.

तीन दिवस उलटून सुद्धा प्रशासनाकडून कोणतीच ठोस दखल न घेतल्याने शेतक-यांमधे सरकारप्रती कमालीची नाराजी पसरली आहे. शुक्रवारी सुकानु समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य देवानंद पवार यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी ते म्हणाले की यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्या म्हणुन कुप्रसिद्ध जरी असली, तरी आता फवारणीने आणलेले संकट व नैसर्गिकरीत्या आलेले संकट पाहून आता या जिल्ह्याची ओळख संकटग्रस्त जिल्हा म्हणुन होत आहे. या भेटी दरम्यान तालुका सुकानु समितीचे रुद्रा पाटील कुचणकार, दिलीप भोयर, मिलिंद पाटील, अजय धोबे, अमोल टोन्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार कासावर यांची भेट
निळापूर येथे चालू असलेले शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वणी विधानसभेचे माजी आमदार वामनराव कासावर यांनी भेट दिली, यावेळी त्यांनी शेतक-यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे टिकाराम कोंगरे, प्रमोद वासेकर, यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष बाब म्हणुन अहवाल सादर
नुकासान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून विशेष बाब म्हणुन मदत मिळावी यासाठी उपविभागिय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार रवींद्र जोगी, तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणुन मदत मिळावी यासाठी अहवाल शासनाला पाठविला आहे.

पालकमंत्री आल्या शिवाय उपोषण सोडणार नाही
जिल्ह्याचे पालकमंत्री जो पर्यंत इथे येवून उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट देवून आमच्या समस्या जाणून घेत नाही, तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने शनिवारी या ठिकाणी पालकमंत्री व किशोर तिवारी हे भेट देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात दिसत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.