नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील जिजाऊ चौकात मराठा सेवा संघाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून 348 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या प्रमाणे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी 6 जून 1674 ला राज्यभिषेक सोहळा रायगडावर करून खऱ्या अर्थाने रयतेच्या राज्याची स्थापन केली. त्या घटनेला आज 347 वर्ष पूर्ण झाली.
त्या निमित्य मराठा सेवा संघ मारेगावच्या वतीने शहरातील जिजाऊ चौकात छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष ज्योतिबा पोटे, तहसीलदार दीपक पुंडे, मसेस जिल्हा कार्याध्यक्ष अनंत मांडवकर, सुधाकर इंगोले, अनामिक बोढे, कुंदन पारखी ,पत्रकार अशोक कोरडे,युवराज बदकी, संभाजी ब्रिगेडचे किशोर जुनगरी, खुशाल कायरकर आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा: