झरी पंचायत समिती मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा

आरोग्य व्यवस्था सुधारणे हेच खरे अभिवादन: गोंड्रावार

1

सुशील ओझा, झरी: येथील पंचायत सामितीच्या प्रांगणात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान झरी जामणी तालुक्यातील सरपंच, सचिव व तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी ह्यांच्या सोबत कोरोना महामारी संदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्स देखील घेण्यात आली.

विरोधात व कोरोना लसीकरणा संदर्भात जास्तीत जनजागृती करा व लोकांना लसीकरन करण्यकरिता सर्वांनी मिळुन प्रयत्न करायला पाहीजे व तालुक्यात 100 % लसीकरण कसे करून घेता येईल आपण सर्वानी मिळुन प्रयत्न करू असे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन करण्यात आले.

तालुक्यातील सरपंच, सचिव व आरोग्य कर्मचाऱ्यांना यांना सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य यंत्रणेत सुधारणा हीच खरी आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी गटविकास अधिकारी मुंडकर व पं.स. सदस्य उपस्थित होते.

हे देखील वाचा:

तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

घरभाडे मागितले म्हणून घरमालकाला जबर मारहाण

 

1 Comment
  1. […] झरी पंचायत समिती मध्ये शिवराज्यभिषेक… […]

Leave A Reply

Your email address will not be published.