विविध शासकीय विभागातील 2 लाख रिक्त पदे भरण्याची भाजपची मागणी

उपविभागीय अधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शासकीय विभागात आजच्या स्थितीत 2 लाख 93 पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. कोरोनाच्या काळात शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्ण भरती होणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या महाराष्ट्रात असलेल्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी करणारे निवेदन आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

सध्या महाराष्ट्रात नियमितपणे अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. परंतु नवीन पदभरतीला मंजुरी मिळत नाही. कोरोना काळात शासनाच्या प्रशासकीय विभागांच्या कामकाजात मोजक्याच कर्मचा-यांचा सहभाग होता. मात्र अ‍ॅनलॉक मध्ये कर्मचा-यांचा तुटवडा नेहमीप्रमाणे भासणार आहे. प्रशासकीय विभागांच्या अधिपत्याखाली गटनिहाय अ, ब, क, व ड अशी अधिकारी व कर्मचा-यांची पदे भरण्यात यावी. राज्य शासनाच्या 29 विभागांसह जिल्हा परिषदांमध्ये रिक्त पदे असल्याने प्रशासकीय कामकाज हाताळतांना या विभागातील प्रमुखांची कसरत होत आहे.

सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे खालीलप्रमाणे आहेत. गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा विभाग, कृषी व पदुम विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल विभाग, वनविभाग, मुदत व पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, वित्त विभाग, आदिवासी विभाग, शालेय शिक्षण, सहकार विभाग, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग, समाज कल्याण, उद्योग विभाग, अन्नपुरवठा, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण, विधी व न्याय, नगरविकास, नियोजन विभाग, कौशल्य विकास, ग्राम विकास, पर्यटन विभाग, सामान्य प्रशासन, मृद व जलसंधारण, गृहनिर्माण, अल्पसंख्यांक, पर्यावरण, मराठी भाषा विभाग, अशा विविध विभागांमध्ये रिक्त पदे आहेत.

ही रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे यासाठी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वणी शहर तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष तथा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजपा जिल्हा सरचिटणीस रवि बेलुरकर, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नितीन वासेकर, राकेश बुग्गेवार, संदिप बेसरकर, अविनाश आवारी, सत्यजित ठाकुरवार, आशिष डंभारे, दिपक पाऊनकर, निखील खाडे, वैभव मांडवकर, अक्षय देठे, रोशन मोहीतकर इत्यादी भाजपा व भाजयुमोचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

वणीत साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.