वणीत साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जीवनातील विविध प्रसंग सांगून उपस्थितांचे उद्बोधन

1

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील महाराष्ट्र बँक जवळील साने गुरुजी चौकात महाराष्ट्र माऊली साने गुरुजीं यांच्या 72 व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, मित्रमंडळ व संस्कार भारती समिती या संस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी साने गुरुजी चौकात त्यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर माधव सरपटवार यांनी साने गुरुजींच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून उपस्थितांचे उद्बोधन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. या वेळी हरिहर भागवत, अर्जुन उरकुडे, प्रमोद सप्रे, सागर मुने, राजेश महाकुलकर, जयंत लिडबिडे, गजानन भगत, सुरेश बन्सोड, देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, निलेश चचडा, प्रकाश कौरासे, केतन लाभे, प्रमोद सप्रे, कवडू पिंपळकर, वसंत गोरे, प्रसन्न संद्दलवार, मनीष निमेकर, सुरेश बनसोड, राम मेंगावर, राजू धावांजेवार, महादेव दोडके, अरुण कावडकर, दीपक भोयर नागरिक इत्यादी उपस्थित होते.

हे देखील वाचा:

धाकट्या भावाचा मोठ्या भावावर चाकूने हल्ला

मुंगोली गावाला संवेदनशील गाव यादीत समाविष्ट करण्याची मागणी

1 Comment
  1. […] वणीत साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अ… […]

Leave A Reply

Your email address will not be published.