इलेट्रिक शॉक लागून सोमनाळा येथे इसमाचा मृत्यू

पावसामुळे छतावर आला होता इलेक्ट्रिक करंट

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सोमनाळा येथे शनिवार दुपारी 12 वाजताच्या सुमारास करंट लागून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वाल्मिकी नामदेवराव ढोके (57) असे मृतकाचे नाव आहे.

वाल्मिकी हे आज शनिवारी 12 जून रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घराच्या छतावर कामानिमित्त गेले होते. काल पाऊस झाल्याने छताला करंट आला होता. छतावरील पाण्याच्या संपर्कात येताच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांना त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेचा तपास डोमाजी भादिकर करीत आहे. त्यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.