वादळामुळे चुना फॅक्टरीवरचे छत उडाले, कोट्यवधींचे नुकसान
गणेशपूर येथील डीलाईट कंपनीतील घटना
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गणेशपूर येथील डीलाईट केमिकल प्रा लिमिटेड या कंपनीचे छत उडाले. काल मध्यरात्री 11 जून रोजी ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तर माल भिजल्याने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.
11 जूनच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मोठ्या जोमात पावसाने हजेरी लावली. जोरात सुरू असलेल्या वादळ वाऱ्यामुळे गणेशपूर शिवारात असलेल्या मे डीलाईट प्रायवेट लिमिटेड कंपनीचे संपूर्ण छत उडून गेले. गोडाऊनमध्ये चुन्याचे पोते व माल पॅक करून होता. याशिवाय इतर सहित्य ही होते. पावसामुळे सर्व माल खराब झाला आहे. हे नुकसान 2 कोटीच्या घरात असल्याची माहिती कंपनीचे मॅनेजर अनुप शुक्ला यांनी दिली.
कंपनीचे टिनाचे छप्पर उडाल्याने कोणतेही जीवित हानी झाली नससल्याचे सांगण्यात आले. कंपनीला लागूनच कंपनीतील कामगार यांचे सुद्धा कॉटर लागूनच होते त्यांना कोणतेही दुखापत झाले नाही. दुसरा शनिवार असल्याने कार्यालये बंद असल्याने या घटनेचा पंचनामा होऊ शकला नाही व पोलीस स्टेशनला कोणतेही तक्रार देण्यात आली नाही.
कंपनीतील एकूण नुकसान किती झाले याची अचूक माहिती महसूल विभागातर्फे पंचनामा झाल्यावरच कळणार. डीलाईट कंपनीतील चुना विदर्भात फेमस असून अनेक राज्यात याचा पुरवठा होतो. उच्च दर्जेचा चुना असल्याने अनेक राज्यात याची मागणी आहे. पावसाने कोट्यवधींचा चुना खराब झाल्याने कंपनीने मोठे नुकसान झाले आहे.
हे देखील वाचा: