चिखलगाव येथील हायवे वरील खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण

खड्डा न बुजवल्यास रस्ता बंद करणार, काँग्रेसचा इशारा

1

जब्बार चीनी, वणी: चिखलगाव येथील यवतमाळ रोडवर असलेल्या खड्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ह्या खड्डामुळे छोटेमोठे अपघात झाले आहे. मात्र सुदैवाने यात कोनतीही जीवित हानी झाली नाही. सध्या पावसाळा लागल्याने हा खड्डा आता जास्त धोकादायक झाला आहे. त्यामुळे हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी काँग्रेसचे अशोक नागभी़डकर व प्रदीप खेकारे यांनी केली आहे.

लालपुलीया परिसर हा अपघातासाठी सर्वात संवेदनशील परिसर मानला जातो. अनेक अपघात इथे घडलेले आहे. त्यातच आता इथे असलेल्या खड्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरले आहे. रोज हजारो लोक या रस्त्यावरून प्रवास करतात. पावसाळ्यामुळे या खड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे हा खड्डा प्रवाशांना दिसून येत नाही. 

या खड्यामुळे छोटे मोठे अपघात होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल प्रदीप खेकारे यांनी उपस्थित केला आहे. हा खड्डा त्वरीत बुजविण्यात यावा अन्यथा तो रस्ता बंद करण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस तर्फे देण्यात आला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

 

Leave A Reply

Your email address will not be published.