वणीत ओबीसी महासंघातर्फे गुरूवारी निदर्शने आंदोलन

ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत महासंघ आक्रमक

0

जब्बार चीनी, वणी: केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यास अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. याबाबत विविध ओबीसी संघटनेने वेळोवेळी मोर्चा तसेच आंदोलने करण्यात आली. त्यामुळे अखेर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गुरुवारी दिनांक 24 जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनांतर्गत दुपारी 12 वाजता जिल्हाकचेरी व तहसील कार्यालय समोर निदर्शने केले जाणार आहे. वणीत देखील हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ वणी तर्फे करण्यात आले आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर यांच्या मार्गदर्शनात हे आंदोलन केले जाणार आहे. वारंवार मोर्चे, आंदोलन, निदर्शने, निवेदन देऊनही केंद्र सरकार ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करीत नाही. याउलट केंद्र सरकारने ओबीसींचे विविध क्षेत्रातील आरक्षण कमी करण्याचा सपाटा लावला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण सध्या रद्द झाले आहे.

राज्य सरकारने आयोग नेमून इम्पेरीकल डाटा सुप्रीम कोर्टासमोर त्वरीत मांडावे, ज्यामुळे ओबीसींचे आरक्षण पुर्ववत होईल. महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यातील कमी केलेले आरक्षण पूर्ववत करावे व ओबीसींच्या इतर केन्द्र व राज्य सरकार कडे प्रलंबीत मागण्या पूर्ण कराव्यात अशी ओबीसी महासंघाची मागणी आहे.

या निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे भालचन्द्र चोपणे, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, विजय पिदुरकर, मोरेश्वर पावडे, गोविंदरावजी थेरे, गणपत लेडांगे, प्रा. टीकाराम कोंगरे, दिनकर पावडे, ऍड. देविदास काळे, मोहन हरडे, राजू अंकतवार, भाऊ आसुटकर, प्रा.बाळासाहेब राजूरकर, दिलीप पडोळे, राजेश पहापळे, श्याम बोढे, संजय देरकर, नितीन चहाणकर, मंगल बल्की, सुरेश बरडे, गजेंद्र काकडे, ऋषी पेचे, मारोती जिवतोडे, प्रदीप बोणगिरवार, विकास पिदुरकर, विनोद बोबडे, काशिनाथ पचकटे, गणेश खंडाळकर, दिगंबर थेरे, प्रमोद वासेकर, नीळकंठ धांडे, गितेश वैद्य, दिपक रासेकर, विलास मांडवकर, लक्ष्मण इद्दे, गणेश मत्ते आदींनी केली आहे.

हे देखील वाचा:

सायकलवरून पुलाच्या खाली पडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मानवतेला काळीमा: मोठे वडिलांनी केले 10 वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.