मारेगाव येथे ग्रामीण पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन
ग्रामीण पत्रकार संघटनेचे मुख्यमंत्र्यास निवेदन
नागेश रायपुरे, मारेगाव: संविधानाचा चौथा आधार स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या अनेक मागण्या मात्र प्रलंबितच आहे. याच अनुषंगाने ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पी.एल. शिरसाठ यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकारांच्या विविध मागण्या घेऊन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना ग्रामीण पत्रकार संघाची तालुका शाखा मारेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामीण पत्रकार संघाला राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेप्रमाणे मान्यता देण्यात यावी. ग्रामीण भागातील नियमित पत्रकारांना ॲक्रीडीएशन द्यावी जेणे करून ग्रामीण स्तरावरील मान्यताप्राप्त पत्रकारांना एस.टी. प्रवास सवलत, रेल्वे प्रवास सवलत, टोलनाका सवलत आदी सवलती मिळेल.
बातमीदारी पत्रकारांना अनेकदा संकटांचा सामना करावा लागतो. प्रसंगी प्राण सुद्धा गमवावे लागतात. त्यामुळे पत्रकरांना शासनाकडून दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे. कोरोनामध्ये वृत्तांकन करताना मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकारांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करावी. ग्रामीण पत्रकारांना नियमित मानधन मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय तालुका व जिल्हास्तरावर अशासकीय समितीवर संबंधित ग्रामीण भागातील पत्रकारांची निवड करावी. संबंधित वृत्तपत्र मालक/संपादक यांनी पत्रकार/वार्ताहर/प्रतिनिधी/बातमीदार/छायाचित्रकार म्हणून ओळख पत्र द्यावे. तीन वर्षापर्यंत नियमित बातम्या पाठवणारे पत्रकारांना कायम स्वरुपी ओळख पत्र द्यावे. सतत विस वर्ष पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना सेवानिवृत्ती वेतन (पेन्शन) ची व्यवस्था करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे ज्योतीबा पोटे, माणिक कांबळे, देवेंद्र पोल्हे, नागेश रायपुरे, अशोक कोरडे, उमर शरीफ, श्रीधर सिडाम, दिलदार शेख यांच्यासह ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
हे देखील वाचलंत का?
सालेभट्टी प्रकरणात तक्रारदारांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न