रंगकाम करताना घरावरून कोसळून पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू

छोरीया ले आऊट येथील घटना

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: घराला गच्चीवर रंगकाम करताना तोल जाऊन खाली कोसळल्याने पेन्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज संध्याकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. योगेश असे पेन्टरचे नाव असून त्याचे वय अंदाजे 32 आहे. तो बाहेरगावाहून वणी येथे रंगकाम करण्यासाठी आला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी शहरालगत असलेल्या छोरीय ले आऊट येथे बलकी यांचे घर आहे. त्यांच्या घराचे रंगकाम सुरू आहे. यवतमाळ येथील ठेकेदार अशोक राठोड यांनी त्या घराच्या रंगकामाचा ठेका घेतला होता. रंगकामासाठी त्याने यवतमाळहून मजूर आणले होते. बलकी यांच्या घराचे काम शेवटच्या टप्प्यात आले होते.

आज दिनांक 3 जुलै रोजी संध्याकाळी सव्वा 6 वाजताच्या सुमारास पेन्टर योगेश हा घराच्या पहिल्या माळ्याच्या गच्चीवरील पायरीला रंग मारण्याचे काम करत होता. काम करत असताना त्याचा अचानक तोल गेला व तो वरून थेट वरून खाली अंगणात कोसळला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. वृत्त लिहेपर्यंत घटनेचा पंचनामा सुरु होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ठेकेदार अशोक राठोड यांनी त्याला उपचारासाठी नेण्यासाठी ऍटो थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृतकाचे नाव योगेश असून तो नेरचा असल्याची माहिती ठेकेदाराने दिली. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचलंत का?

चोरट्यांनी ‘फोडले’ मारेगावातील देशी दारूचे दुकान

Leave A Reply

Your email address will not be published.