कायर ते सिंधीवाढोणा मार्गाची दुरुस्ती करा, राष्ट्रवादीचे निवेदन
विदर्भा नदीवरील पुलाची उंची वाढविण्याचीही मागणी, मागणी मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील कायर पासून सिंधीवाढोणा करीता जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली असून यामुळे वाहतुकीस त्रास होत आहे. तसेच अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा रस्त्याची दागडुजी तातडीने करावी, तसेच या मार्गावर असलेल्या पुलावरून पावसाळ्यात पाणी जाते त्यामुळे पुल पार करताना जिवाला धोका निर्माण होते. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी अशा आषयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.
कायर ते सिंधीवाढोणा हा 4 किलोमीटरचा रस्ता असून सदर रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याच मार्गावर विदर्भा नदी जाते. ही नदी पार करून प्रवास करावा लागतो. मात्र पावसाळ्यात या पुलावरून पाणी जाते. याआधी या पुलावरून तिघे जण वाहून गेले होते. मात्र तरीदेखील प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही केली नाही असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
सदर मार्गावरुन पठारपुर, सिंदीवाढोणा, पिल्कीवाढोणा, डोंगरगाव, बोपापूर, बाळापुर, कोसारा गावातील शेतकरी प्रवास करतात. त्यामुळे मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी व पुलाची उंची वाढवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस वणीतर्फे करण्यात आली आहे. जर यावर कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, सुर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरीया, रामकृष्ण वैद्य, विजया आगबत्तलवार, सविता ठेपाले, मारोती मोवाडे यांच्या सही आहेत.
हे देखील वाचा: