पाटण पोलिसांनी केला गोवंश तस्करीचा पर्दाफाश

गोवंश जनावरे नेताना दोन ट्रक व ६३ गोवंश ताब्यात

0

रफिक कनोजे, मुकुटबन: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत तेलंगाणाला जोडना-या दिग्रस अनंतपुर पुला जवळील वन विभागाच्या चेकपोस्टवर आदिलाबाद रोडवर रविवारी रात्री एक वाजता २ ट्रकमध्ये निर्दयतेने ६३ गाय व बैल कोंबून नेताना पकडले. फय्याज अहेमद मुबारक अली (३३) मोमिनपुरा कब्रस्तान रोड नागपूर ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून एक ट्रक चालक फरार आहे.

पाटण पोलिस स्टेशन ठाणेदार शिवाजी लष्करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चेक पोस्टवर गोवंशाचे ट्रक चेकपोस्टवरुन सोडण्यात येईल अशी माहिती त्यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी सुरेश सलामे, अमोल अनेरवार, द्न्यानेश्वर सोयाम यांना पाठवले. त्यांनी तीथे ब्यारीकेट्स द्वारा नाकाबंदी करण्यात आली. तेवढ्यात एक ट्रक आला तो ट्रक पोलिसांना कट मारून ब्यारीकेटस तोडून फरार झाला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट ठाणेदारांना मोबाईल वर सांगितली त्यावरुन त्यांनी सोबतीला सुभाष मेश्राम ला घेवुन मोटर सायकल ने घटना स्थळावर पोहचले.

त्यानंतर दुसरा ट्रक तिथे आला त्याला ठाणेदार आणि सहा पोलीस कर्मचा-यांनी जीवाची पर्वा न करता थांबविले. त्यानंतर आणखी चार ट्रक आले पण पोलीस कर्मचारी कमी असल्याने ते ट्रक पलटून पळून जाण्यात यशस्वी झाले,

जप्त करण्यात आलेल्या दोन ट्रकमध्ये ६३ गाई आणी बैल होतें. त्यांना ताब्यात घेवून कोंडवाड्यात दाखल करण्यात आले आहे. त्यात २५ मोठे नगाची किंमत 3 लाख 75 हजार रुपये. लहान नगाची किंमत 3 लाख 80 हजार रुपये. व दोन ट्रकाची किमत 40 लाख असे एकूण 47 लाख 55 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

गोवंशाचे ट्रक वनविभागाच्या चेकपोस्टवरुन वनमजुर सुरक्षाकर्मी रमेश लक्षट्टीवार व काही पोलिसांच्या मदतीने प्रत्येक ट्रक मागे दोन हजार रुपये घेवून सोडले जातात अशी माहिती ठाणेदारांना मिळाली होती. वनमजुर सुरक्षा रक्षक रमेश लक्षट्टीवार याच्या कडे गोवंश तस्कर करणारे ट्रक चालक, मालकाचे आणि काही पोलिसांचे मोबाईल नंबर आहेत. तो ठाणेदारची संपूर्ण लोकेशन पोलिसांच्या मदतीने तस्कराना देतो. त्याच माध्यमातूनच ही तस्करी होते.

दिग्रस परिसरात चर्चा होती की पोलिसांच्या कार्यवाही नंतर सुद्धा पहाटे पाच ट्रक पैसे घेवुन या सुरक्षा रक्षकाने सोडले. ट्रकचालक तर पोलिसांच्या अंगावरच ट्रक नेत होते. या चेकपोस्ट वरुन मंगळवार, शुक्रवार, शनिवार च्या रात्रीला जास्त ट्रक जातात. दिवसा सुध्दा गोवंश तस्करीचे ट्रक जातात. व हे सर्व रमेश च्या माध्यमातून होते त्यामुळे वन विभागाची इभ्रत वेशीवर टांगली जात आहे.

पुढील तपास ठाणेदार शिवाजी लश्करे यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामसुंदर रायके, सुरेश सलामे, अमोल अनेरवार, द्न्यानेश्वर सोयाम, सुभाष मेश्राम, महिला पोलिस जया रोगे व इतर कर्मचारी करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.