शिंदोला ते साखरा मार्गाची तातडीने दुरुस्ती करा

विजय पिदूरकर यांची मागणी, दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील शिंदोला ते साखरा, जुगाद गावाला जोडणारा रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत आज बुधवारी दिनांक 14 जुलै रोजी विजय पिदूरकर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना निवेदन देण्यात आले.

शिंदोला ते साखरा, जुगाद या रस्ता अतिशय वरदळीचा आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. परिणामी या रस्त्यावर रोजच छोटे अपघात होत आहे.

शिंदोला ते साखरा हा रस्ता वरदळीचा आहे. याच रस्त्यावर कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या परिसरातील 30 ते 35 गावातील लोकांना उपचारासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. तसेच शिंदोला येथे बँक व मुख्य बाजारपेठ असल्याने माथोली, जुगाद, साखरा, कोलगाव, मुंगोली, शिवणी, चिखली, टाकळी, येनक, हनुमान नगर, शेवाळा या गावातील लोकांना प्रवास करावा लागतो.

सदर रस्ता द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती योजनेत मंजूर आहे. रस्ता दुरुस्ती करण्याकरिता वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रस्त्याची वाहतूक योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी विजय पिदूरकर यांनी केली आहे. त्वरित रस्ता दुरुस्त न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी राजूभाऊ दातारकर, विश्वास बोरपे, सुनील माथुलकर, निखिल उपासे, गणेश मत्ते आदी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.