नव्या ठाणेदारांची अवैध जनावरांच्या तस्करांवर धडाकेबाज कार्यवाही
सुरवात चांगली वणीकरांची प्रतिक्रिया
विवेक तोटेवार, वणी: वणीतून तेलंगणा राज्यात अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे बुधवारी वणी पोलिसानी पकडले.10 लाखांचा ट्रक आणि 6 लाखांचे जनावरे असा सुमारे 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी टालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राप्त महितीनुसार वणी पोलिसांनी वरोरा नाका या ठिकाणी नाकाबंदी लावली असता त्यांना जनावरांच्या तस्करीबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर एम एच 40 वाय 4734 या ट्रकला अडविले व तपासणी केली असता त्यामध्ये 29 जनावरे ज्यांची किंमत 6 लाख रुपये आहे. त्यांना निर्दयपणे बांधून कोणत्याही प्रकारची चारापाण्याची व्यवस्था न करता दिसून आली. याबाबत चालक कृष्णा गोपाल पुरी (29) राहणार दुर्गावती चौक नागपूर यास विचारणा केली असता. सदर जनावरे गाडीतच असलेल्या मारोती गोविंद पुरी याची असल्याचे सांगण्यात आले.
यांच्या सोबत निसार नाशिर शहा (34) वर्धा यासही ताब्यात घेण्यात आले हा इसम गाडीतील केबिनमध्ये होता . या तीनही आरोपीवर प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यासबधी प्रतिबंधक अधिनियम1960 कलम 11(1)घ ड झ कलम 5 (अ) (ब) महाराष्ट्र अनिमल प्रिझवेसन ऍक्ट 1995 कायद्यानुसार कार्यवाही करण्यात आली.
पकडण्यात आलेल्या जनावरांना श्री राम गोरक्षण घोंसा या ठिकाणी पाठविण्यात आले. वणीमध्ये नव्याने रुजवू झालेले ठाणेदारांनी आपल्या आगमनाच्या वेळी केलेली ही मोठी कार्यवाही आहे. त्यामुळे सुरवात चांगली झाली अशी प्रतिक्रिया वणीकर जनतेतून येत आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल, विजय वानखेडे ,विजय राठोड, दीपक वंड्रसवार, पंकज लांजेवार , अमित पोयाम, गजानन गोदंबे प्रशांत आडे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, निलेश निमकर यांनी केली.