कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरपीडितांना तात्काळ 5 लाखांची मदत द्या
जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील पुरपीडीत शेतकरी व शेतमजुरांना प्रति कुटुंब 5 लाखाची तातडीची मदत शासनाने द्यावी. अशी मागणी वणी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे करण्यात आली आहे.
नुकत्याच जुलै महिन्यात राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरड कोसळून अनेक गावातील शेकडो घर दबून मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्दा झाली आहे. पुरामुळे हजारो कुटुंब उघड्यावर पडले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचा नुकसानही झाला आहे.
कोरोनामुळे अगोदरच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय असून नैसर्गिक आपत्तीने सुद्धा शेतकऱ्यांवर मोठं संकट आणले आहे. अश्या बिकट परिस्थितीत सरकारनी खुल्या दिलाने मदत करून शेतकरी शेतमजुराचे जीवनमान उंचवावे. यासाठी सरकार कडून कोणतेही निकष न लावता सरसकट सर्वांना 5 लाख रुपये प्रती कुटुंब आर्थिक मदत व रसद पुरवावी. अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे वणी तालुकाध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, जिल्हा सल्लागार ऍड. विप्लव तेलतुंबडे, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, शंकर रामटेके, अजय खोब्रागडे, सूरज दुर्गे, राजकुमार किनाके, रवी कांबळे उपस्थित होते.