भास्कर राऊत, मारेगाव: सायंकाळच्या वेळेस नेहमीप्रमाणे रस्त्याने फिरत असता एका दुचाकीस्वाराने 67 वर्षीय वृद्धास उडविल्याची घटना घडली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबत वृद्धाच्या कुटुंबीयांकडून तक्रार करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील संभाजी नगरमध्ये राहणारे रघुनाथ अर्जुन तुरारे (67) हे नेहमीप्रमाणे 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास काही मंडळीबरोबर वणी रोडवर असलेल्या पेट्रोल पपंकडे फिरायला गेले होते. फिरून परत येत असतानाच मारेगाव जवळील संकल्प नगरीच्या बोर्डजवळ वणीकडून येणाऱ्या स्पेंडर प्लस (MH29 K0025) या वाहनाने तुरारे यांना मागून धडक दिली.
या धडकेमध्ये तुरारे यांच्या डोक्याला, डाव्या पायाच्या घोट्याला तसेच उजव्या पायाच्या पोटरीला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असल्याने त्यांना नागपूर येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे.
वडिलांचा अपघात करणाऱ्या मोटर सायकल चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची तक्रार तुरारे यांची मुलगी संध्या मनोज गडदे यांनी केलेली आहे.
हे देखील वाचा: