शहरातील अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीवर भर
जितेंद्र कोठारी, वणी: येत्या काही महिन्यात वणी नगर पालिकेसाठी होणारी निवडणूक लक्षात घेत सर्व राजकीय पक्ष सज्ज होताना दिसत आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व पक्षात कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी व नवीन कार्यकर्त्यांची भरती करण्यात येत आहे. सोमवार 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष कार्यालयात शहरातील अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा, वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार, शहर अध्यक्ष राजाभाऊ बिलोरिया यांच्या उपस्थितीत अनेक जणांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. गजेंद्र मारोतराव काकडे,
नरेश वसंतराव बेलेकर, पद्माकर पंढरीनाथ देवळकर, प्रशांत मधुकर गोहोकर, पवन अशोकराव निब्रड, किशोर दामोधर ठेंगणे, राजेंद्र नारायण जेनेकर व इतर असे प्रवेश घेणाऱ्याचे नाव आहे.
यावेळी राकांप तालुका अध्यक्ष सुर्यकांत खाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई आगबत्तलवर, महिला शहर अध्यक्ष सविता ठेपाले, मारोती मोहाडे, रामकृष्ण वैद्य उपस्थितीत होते.
या वेळी डॉ. महेंद्र लोढा यांनी पक्ष प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्ष कसा वाढवायचा आणि संघटना कशी मजबूत करायची याबाबत मार्गदर्शन केले. वणी विधानसभा अध्यक्ष जयसिंग गोहोकार व शहर अध्यक्ष राजाभाऊ बीलोरिया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुर्यकांत खाडे यांनी आभार मानले.