सुशील ओझा, झरी: तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेल्या अडेगाव, खडकी, गणेशपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी खाणी आहेत. या खाणीतून मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होते त्यामुळे खडकी ते अडेगाव रस्त्याची चाळणी झाली आहे. या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्थानिक तरुणांनी अखेर खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दिनांक 30 ऑगस्टपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
अडेगाव ते खडकी रस्त्याची क्षमता 10 टनची आहे. मात्र या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होते. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. याबाबत प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार कऱण्यात आला. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर मंगश पाचभाई यांच्या नेतृत्वात खडकी बस स्थानकाच्या बाजूला खड्यात बसून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
अडेगाव-खडकी रस्त्याचे काँक्रिटीकरण, ओव्हरलोड वाहतूक बंद करावी, रस्त्यावरील नवीन पूल बांधावे, अवजड वाहतूक संध्याकाळी सुरू करावी, संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात यावे अशा विविध मागण्या आंदोलकांच्या आहेत.
मागण्यांकडे लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात राहुल ठाकूर, दत्ता लालसरे, गिरीधर राऊत, दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर इ. सहभागी झाले असून त्यांना गावक-यांनी पाठिंबा दिला आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.