झरी तालुक्याची शामादादा कोलाम संघटना गठीत

अध्यक्ष कैलास आत्राम तर देवा टेकाम सचिव

सुशील ओझा, झरी: झरी येथे 29 ऑगस्ट रोजी पाटणाई देवस्थान येथे शामा दादा कोलाम संघटनेची झरी तालुक्याची नविन कार्यकारणी समिती गठीत करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष म्हणून कैलास लालुजी आत्राम, उपाध्यक्ष पांडु चिनू टेकाम, देवा गोली टेकाम यांची सचिव तर कोषाध्यक्ष म्हणून संजय रामदास आत्राम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Podar School 2025

निवडणुकीचे सल्लागार मंडळीने मिळुन निर्णय घेतले त्या ठिकाणी सर्व कोलाम बांधव व सर्व कार्यकर्ते उपस्थि होते. कार्यक्रम समितीचे अध्यक्ष जानराव सोनु दडांजे, उपाध्यक्ष गंगाधर आत्राम, सचिव बाळू आत्राम, सल्लागार समितीचे अध्यक्ष, तुकाराम आत्राम, माजी अध्यक्ष संतोष मेश्राम, माजी सचिव आत्माराम आत्राम व यवतमाळचे विजय ढोबरे, सामजिक कार्यकर्ता सोनेराव आत्राम इत्यादी उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.