राजूर ग्रामपंचायत बनले समस्यांचे आगार

समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माकपचे निवेदन

जब्बार चीनी, वणी: राजूर येथील ग्राम पंचायतीचे लक्ष काही समस्यांकडे वेधण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव काम्रेड कुमार मोहरमपुरी यांनी ग्रापं ला नुकतेच निवेदन दिले आहे. सध्या राजूर गावात अनेक समस्या फोफावल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने हे निवेदन देण्यात आले.

राजूर गाव हे देशभरात चुना उत्पादक म्हणून नावारूपास आहे. बारा ही महिने सुरू असलेल्या ह्या चुना उत्पादनाला दिवाळी चे अगोदर मोठा उभार येत असते. पोळ्याच्या नंतर चुना उत्पादन दिवाळी पर्यंत मोठ्या प्रमाणात होत असते. ह्या दिवसात चुन्याला खूप मागणी असते. त्यामुळे येथील कामगारांना मोठ्या संख्येने काम मिळत असते. ह्या दिवसांमध्ये रात्रंदिवस कार्य सुरू असते. त्यामुळे कामगारांना रात्रंदिवस घरून कामावर जावेयावे लागते.

ह्यातच पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ते व पथदिवे योग्य प्रकारे चालू स्थितीत असणे अति आवश्यक असते. त्यामुळेच चुनभट्टी क्षेत्रातील राजीव गांधी चौकात हायमास्ट लाईट लावण्यात यावा, पथदिवे सुरू ठेवावे, रस्त्याच्या कडेला असलेल्या व वाढलेले गाजर गवत, झुडपी साफ करण्यात यावे, रस्त्यावर आलेली झाडे व्यवस्थित करून रस्ते साफ करावीत, त्याच प्रमाणे गावात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी कुत्रे समूह बनवून असतात त्यामुळे एकट्या माणसावर त्यांच्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही,

परिणामी मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यांची नसबंदी करण्यात यावी, तसेच वार्ड क्र. २ मध्ये वसलेल्या साईनगर भागात मोठी वस्ती झाली आहे, परंतु ह्या ठिकाणी सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीच नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचलेले असते, परिणामी मच्छरांच्या प्रकोप वाढल्याने साई नगर मध्ये नालीचे बांधकाम करावे, इत्यादी मागण्यांचे निवेदन माकपचे कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी राजूर ग्रापं ला दिले आहे.

हे देखील वाचा:

पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.