रवि ढुमणे, वणी: वणीच्या ग्रामीण रुग्णालतातून दोन दिवसाचे बाळ चोरून नेल्याची खळबळजनक घटना घडली होती . संबंधित कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या काही तासातच बाळ मातेच्या कुशीत दिले. शिपायाच्या सतर्कतेमुळे इतक्या लवकर या प्रकरणाचा छडा लागला. जाणून घ्या या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम…
वणी शहरातील रजा नगर भागातील नुसरतचा हिंगणघाट येथे अब्दुल सत्तार यांच्याशी निकाह झाला होता. प्रसूतीसाठी ती आपल्या आईवडिलांकडे आली होती. दरम्यान 6 नोव्हेंबर ला तिला प्रसूतीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी नुसरतने गोंडस बाळाला जन्म दिला.
मंगळवार रात्री 1.30 वाजता : मंगळवारी रात्री दीड वाजताचे सुमारास नुसरतच्या कुशीत असलेले बाळ अज्ञात चोरट्यानी चोरून नेले.
रात्री 4.30 वाजता: साडेचार वाजता नुसरत झोपेतून उठली. तेव्हा तिला तिच्या बाजुला बाळ दिसले नाही. तिने आजुबाजुला विचारपूस केली असता तिथं बाळ चोरीला गेल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यामुळे रुग्णालयात एकच कल्लोळ झाला. नुसरते नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले.
पहाटे 4.45 वाजता : पावने पाचच्या सुमारास फोनवरून या घटनेची माहिती देण्यात आली.
पहाटे 5.00 वाजता: पोलीस रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी आजुबाजुला शोध घ्यायला सुरूवात केली. सोबतच इतरांनीही रुग्णालयात आणि परिसरात शोध घ्यायला सुरूवात केली.
सकाळी 6 वाजता: नुसरतच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सकाळी 8 वाजता: वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरविली. सर्व पोलीस यंत्रणा तपासाला लागली. यात पूर्वी डीबी पथकामध्ये कार्यरत असलेले उल्हास कुरकुटे यांनी सूत्रे हलवीत चोरट्यांचा सुराग लावला.
सकाळी 9 वाजता: रुग्णालय परिसरातील तसेच दामले फैल भागातील काही संशयितांना पोलिसांनी चौकशीला ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. यात सदर बाळ हे आसिफाबाद येथे 60 हजार रुपयात विकल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली.
सकाळी 9.30 वाजता: सकाळी साडेनऊच्या सुमारास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील शेख नफिस, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, दीपक वांड्रसवार, आनंद अलचेवार आणि स्वतः डीबी पथकात नसलेले उल्हास कुरकुटे हे चोरट्यांच्या दिशेने आंध्र प्रदेशातील असिफाबादकडे रवाना झाले.
10.30 वाजता: वणी पोलीस आसिफाबाद येथे पोहोचले.
11 वाजता: 11 वाजताच्या सुमारास पोलीस ज्या ठिकाणी बाळ आहे त्या ठिकाणी पोहोचून त्यांनी बाळाला हस्तगत केले.
12.00 वाजता: 12 च्या सुमारास वणी पोलीसांची चमू वणीकडे रवाना झाली.
4.00 वाजता: लवकरच ती आता बाळाला घेऊन पोलीस चमू ठाण्यात दाखल होणार आहे.
मंगळवारी बाळ चोरटे रात्रीच्या सुमारास रुग्णालयात घिरट्या घालत होते. वास्तविक बघता यातील एक जण तर रुग्णालयात कामकाज करीत असतो. बाळ सुंदर आणि गोंडस दिसलं आणि यांची यापूर्वी आखून ठेवलेली योजना सफल झाली. नुसरतला देखणे गोंडस बाळ झाले आणि यांनी सूत्रे हलविली. व रात्री दीड चे सुमारास सर्वच गाढ झोपेत असतांना चोरट्यानी डाव साधला. रात्रीच बाळ चोरून त्याला पुढच्या लोकांकडे सुपूर्द केले. आता बाळ चोरून नेणारे दोघेच आहे की, बाळाला विकत देणारा दलाल आणखी कोण? आहे हे पोलीस तपासात उघड होईल. परंतु यात आणखी काही जण सामील असल्याची चर्चा आहे.
रुग्णालय प्रशासनावरच प्रश्नचिन्ह?
वणी ग्रामीण रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रसूती सिझेरियन साठी खाजगी रुग्णालयाची वाट दाखविण्यात येते. खाजगी डॉक्टरांचा वरदहस्त असल्याने येथे सर्वच फावते. रुग्णालायत शासकीय कर्मचाऱ्या सोबत बाहेर काम करणारे सुद्धा रुग्णालय कर्मचारी असल्याचे दाखवितात. खाजगी लोकांच्या भरवश्यावर रुग्णालयात कामकाज चालविण्यात येते. आणि अश्या घटनांना वाव मिळतो. लोकप्रतिनिधी ची उदासीनता व खाजगी डॉक्टरांना सहकार्य यामुळेच ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपळला आहे. एकूणच बाळ चोरी प्रकरणाने रुग्णालयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोण आहे आरोपी?
लवकरच…….