विवेक तोटेवार, वणी: सोमवार रात्री आपल्या कर्तव्यावर असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी वनीतील पेटूर गावाजवळ वाहनांची तपासणी सुरू केली .मिळालेल्या माहितीच्या आधारावर सिल्व्हर रंगाची सुमो गाडी क्रमांक एम एच 34 ए ए 6269 या वाहनास अडवून तपासणी केली असता त्यामध्ये देशी दारूचे 20 बॉक्स आढळून आले याबाबत चालक राजू मारोती अलीवार राहणार गायकवाड फैल वणी यास वणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्याच्याकडे मिळालेल्या मालाची किंमत 49920 व यासाठी उपयोगात आणलेल्या वाहनाची किंमत असा एकूण 2 लाख 99 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सुदर्शन वनोळे. नफिस शेख , सुनील खंडागळे , रत्नपाल मोहाडे, दीपक वंडर्सवर यांनी केली.सदर कार्यवाहीत आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यनुसार 65(अ)व(इ) व सहकलम3/181 130(3)/177 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post