चिखलगाव उपसरपंचपदी पुन्हा अमोल रांगणकर  

0

रवि ढुमणे, वणी: गेल्या महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सुनील कातकडे यांच्या गटाने बाजी मारत १४ सदस्य निवडून आणले होते. तर सरपंच म्हणून याच गटाचे अनिल पेंदोर विजयी झाले होते. त्या अनुषंगाने गुरूवारी उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यात अमोल रांगणकर  हे बहुमतांनी विजयी झाले.

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या चिखलगाव येथील मागील महिन्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सरपंच सुनील कातकडे यांनी भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समितीचे उपसभापती संजय पिंपळशेंडे यांच्या गटाचा दारुण पराभव करून सरपंचपदी अनिल पेंदोर व १४ सदस्य निवडून आणले होते.  भाजपा प्रणित दोन तर काँग्रेस प्रणित एक असे विरोधी गटाचे सदस्य निवडून आले होते.

सरपंच पदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली होती. तथापि उपसरपंच पदाची निवड ही सदस्या मधून करवायची असल्याने उपसरपंच पदाची निवड गुरुवारला निश्चित करण्यात आली होती. या निवडीसाठी सुनील कातकडे गटाच्या अमोल रांगणकर, आणि अनिल ताजने दोन सदस्यांनी नामांकन दाखल केले. यात अमोल रांगणकर यांनी १३ मते मिळवीत पुनश्च उपसरपंच पदी स्थान मिळवले आहे. तर ताजने यांना ४  मतावर समाधान मानावे लागले आहे.

चिखलगाव उपसरपंच पदी अमोल रांगणकर, विजयी झाल्याने माजी सरपंच सुनील कातकडे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. सोबतच ग्रामपंचायत कार्यालयात पदग्रहण सोहळ्याचे ही आयोजन करण्यात आले होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.