भास्कर राऊत, मारेगाव: शिवणी येथे काही व्यक्तींकडून दारूची मोठ्या प्रमाणावर अवैधपणे राजरोस विक्री सुरू असून यामुळे गावातील शांतता भंग पाऊण गावामध्ये अराजकता माजू शकते त्यामुळे गावात चालणारी अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी अशी तक्रार शिवणी येथील सरपंच यांनी मारेगाव पोलीस ठाण्यात केली आहे.
मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावर वसलेले शिवणी (धोबे ) हे गांव. येथे अवैध दारू विक्रेत्यांची खुले आम दारू विक्री सुरु आहे. एकीकडे गावात सलोखा व शांतता कायम असावी या साठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असते. परंतु काही उपद्रवी घटका कडून याला छेद दिला जातो. यवतमाळ जिल्ह्याच्या सरहद्दीवर वर्धा नदी लगत असलेल्या शिवणी (धोबे )या गावात मात्र अवैध दारू विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे खुले आम दारू विक्री सुरु आहे.
त्यामुळे मद्यपी लोकांकडून अतिरेक होऊन गावकर्यांना त्रास सहन करावा लागतो. वेळप्रसंगी वादविवाद वाढून भांडणे सुद्धा होतात. काही मद्यपी कडून गावच्या महिला सरपंच यांना सुद्धा शिवीगाळ करून वाद घालतात. काही लहान मुले सुद्धा दारू व्यसनाचे आहारी गेले आहे.
या अवैध दारू मुळे होणारा त्रास थांबावा आणि गावात शांतता असावी या करीता शिवणी (धोबे) येथील सरपंच शशिकला ज. काटवले यांनी मोरगाव पोलीस स्टेशन ला दोन महिन्या पूर्वी निवेदन सादर करूनही संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे अवैध दारू चा महापूर सूरूच आहे. यावरून अवैध दारू विक्रेत्यांना अभय कोणाचे याची चर्चा ग्रामस्थ करतात.
हे देखील वाचा:
Comments are closed.