मध्यरात्री घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पीडिता ओरडताच विकृत आरोपीने मुलीसमोर ठेवली 500 रुपयांची नोट

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तालुक्यातील एका विकृताने विनयभंग केला. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकृती म्हणजे पीडित मुलगी ओरडताच आरोपीने मुलीसमोर 500 रुपयांची नोट ठेवली. आरोपीला पोलिसांनी पहाटेच्या सुमारास एका बारमधून ताब्यात घेतले असून आरोपीवर पुढील कारवाई सुरू आहेत.

संशयीत महादेव बन्सी पाटील (33) हा मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथील रहिवाशी आहे. महादेव हा शहरातील एका बारमध्ये वेटरचे काम करतो. पीडिता (16) ही मारेगावमध्येच राहते. गुरूवारी दिनांक 7 ऑक्टोबरला पीडिता ही तिच्या कुटुंबीयांसह झोपली होती. सर्व झोपेत असताना मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास पीडीतेच्या घरात संशयीत आरोपीने प्रवेश केला.

तिथे जाऊन त्याने पीडितेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या घटनेमुळे मुलगी ओरडली. त्यावेळी या नराधमाने तिला गप्प राहण्यासाठी तिच्यासमोर 500 रुपयाची नोट धरली. तोपर्यंत सर्वच कुटुंब जागे झाले होते. कुटुंबीयांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु घरच्यांना धक्काबुक्की करून तो पळून जाण्यात यशस्वी झाला.

यादरम्यान कुटुंबियांनी व शेजाऱ्यांनी या नराधमाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सापडू नये या भीतीने संशायित आरोपीने पळ काढला व तो पसार होण्यात यशस्वी झाला. पीडित मुलीच्या कुटुंबांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात संशायितास शोधण्यासाठी बिट जमादार आनंद अलचेवार, विनेश राठोड, अजय वाबिटकर हे कामाला लागले.

तपासाची चक्रे जलदगतीने फिरवीले. दरम्यान आरोपी महादेव बन्सी पाटील (३३) हा मारेगाव-वणी राज्य महामार्गावर असलेल्या एका बिअरबार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ठिकाणावरून पहाटे चार वाजताच्या सुमारास बारमधून आरोपीस शिताफीने ताब्यात घेत गजाआड केले. बातमी लिहितपर्यंत आरोपीवर कलम 354 (अ), 452, पोस्को कलम अंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार तसेच मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

शेलू येथे क्षुल्लक कारणावरुण युवकाला मारहाण

Comments are closed.