जितेंद्र कोठारी, वणी: चारित्रावरून संशय घेऊन व वर्णावरून पत्नीचा शारीरिक व मासनिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित मधुकर डोर्लीकर (39), लता मधुकर डोर्लीकर (60), आशिष मधुकर डोर्लीकर (35) आणि ज्योती धनवटे (38) सर्व चैतन्य कॉलोनी, शिवाजी नगर, माजरी (कॉलरी), ता. भद्रावती, जि. चंद्रपूर असे आरोपींची नाव आहे.
फिर्यादी प्रिया अमित डोर्लीकर (34) रा. विनायक नगर, नांदेपेरा रोड, वणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिचे दुसरे लग्न 12 मार्च 2018 रोजी माजरी (कॉलरी) येथील अमित मधुकर डोर्लीकर सोबत येथील बाजोरिया लॉन मध्ये सामाजिक रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी तिच्या सासूने तुझा वर्ण काळा आहे, तू आम्हाला पसंत नव्हती, तुझ्या घरच्यांनी आमच्या माथी मारली. असे टोमणे देऊन त्रास देणे सुरु केले.
दरम्यान प्रिया गर्भवती झाली. त्यावरून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासू, पती, दीर यांनी 7 महिन्याचा गर्भ पाडण्यासाठी दबाव टाकला. परंतु पत्नी आपल्या वडिलाकडे आली व इथेच 27 एप्रिल 2019 रोजी तिला मुलगी झाली. सासरकडच्या मंडळींनी मुलगी तुझ्यासारखी दिसत नाही असे टोमणे मारत फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेतला. दरम्यान अमित डोर्लीकरला नागपूर जवळील बुटीबोरी येथे नोकरी लागली.
पीडिता आपल्या वडीलांसह 3-4 वेळा बुटीबोरी येथे आपल्या पतीकडे गेली. मात्र तिच्या पतीने तिला मारझोड करुन हाकलून दिले. बुटीबोरी येथे प्लॉट घेण्यासाठी माहेरून 12 लाख रुपये आण असा तगादा पती, दीर, सासू यांनी लावला. आपल्या सोबत घडलेल्या घटनेबाबत पीडितानी दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तक्रारीच्या अनुषंगाने प्रकरण पांढरकवडा येथील समुपदेशन केंद्रात वळविले. मात्र आरोपी एकही वेळ समुपदेशन केंद्रावर हजर झाले नाही. त्यामुळे पीडिता प्रिया अमित डोर्लीकर, रा. चैतन्य कॉलोनी, शिवाजी नगर माजरी, ह.मु. नत्थूजी राऊत, विनायक नगर नांदेपेरा रोड वणी यांनी दि. 13 ऑक्टो. रोजी पुन्हा वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरील सर्व आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम 498 (अ) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जमादार विठ्ठल बुरेवार करीत आहे.
हे देखील वाचा:
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च
Comments are closed.