देवीसमोर जगन्नाथ बाबांचे भजन का गात आहे म्हणत गायकाला मारहाण

दारूच्या नशेत देवीच्या पेंडॉलमध्ये तरुणाचा गोंधळ

जितेंद्र कोठारी, वणी: देवीच्या समोर जगन्नाथ बाबांचे भजन का म्हणतो ? असा निरर्थक वाद घालून भजन करणाऱ्या वृद्ध व्यक्तीला एका तरुणाने जेवणाचे ताट फेकून मारत मारहाण केली. चिखलगाव येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. फिर्यादी विठ्ठल घुलाराम माटे (59) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शुभम नंदू चवणे (24) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

विठ्ठल माटे हे राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथे शिपाई पदावर असून शंकर बाबा भजन मंडळाचे सदस्य आहे. चिखलगाव येथील हनुमान मंदिराजवळ देवी बसविण्यात आली आहे. गणपती, देवीची प्रतिष्ठापना झाल्यावर तिथे भजन ठेवण्याची प्रथा पुर्वापार चालत आली आहे. दि. 14 ऑक्टो. रोजी संध्याकाळी बाबा भजन मंडळाच्या सदस्यांनी देवीसमोरील पेंडॉलमध्ये भजन सुरू होते.

रात्री 8 वाजता दरम्यान आरोपी शुभम चवणे हा दारूच्या नशेत दुर्गा पंडालमध्ये आला. तिथे त्यावेळी जगन्नाथ बाबाचे भजन सुरू होते. दरम्यान शुभमने दुर्गादेवीसमोर जगन्नाथ बाबाचे भजन का म्हणता आहोत असे म्हणत विठ्ठल यांच्यावर जेवणाचे ताट भिरकावले. यात त्यांचा चष्मा तुटला. त्यानंतर आरोपीने वाद घालत विठ्ठल यांचा शर्ट फाडून त्यांना लाता बुक्यांनी मारहाण केली.

विठ्ठल माटे यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी शुभम चवणे विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी शुभम चवणे (24) रा. सदाशिव नगर चिखलगाव विरुद्ध भादंविच्या कलम 427, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा:

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

चपलेने केला घात, घट विसर्जन करताना इसम गेला वाहून

तहसील कार्यालयासमोरील दुकानाला लागली भीषण आग

Comments are closed.