धावत्या दुचाकीवर आदळला रोही, साईनगरी येथील तरुणाचा मृत्यू

वणी-घुग्गुस मार्गावर मंदर जवळील घटना

जितेंद्र कोठारी, वणी: धावत्या दुचाकीवर रोही आदळून साईनगरी येथील तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांआधी अपघातामुळे तरुणावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र शनिवार 16 ऑक्टो. रोजी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झला. गोलू उर्फ निखील प्रकाशचंद कोचर (27) असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार निखील हा साईनगरी येथील रहिवाशी होता. तो डोर्ली येथे कंट्रोल (शिधा वाटप केंद्र) सांभाळायचा. गुरुवारी दि. 14 ऑक्टो. ला सकाळी तो नेहमी प्रमाणे डोर्ली येथे गेला होता. सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान डोर्ली गावातून चारगाव मार्गे तो आपल्या दुचाकीने वणीला परत येत होता. दरम्यान मंदर गावाजवळ त्याच्या दुचाकीसमोर अचानक एक रोही आडवा झाला.

रोहीची गाडीला भीषण धडक झाली. या अपघातात निखील दुचाकीसह डिव्हायडरवर आदळला. त्यात निखीलच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तात्काळ वणी येथील दवाखान्यात आणले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्याला रात्रीच नागपूर येथे एक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघातात निखिलच्या डोक्याला मागील बाजूस जबर मार लागल्यामुळे तो कोमामध्ये जाऊन ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.

नागपूर येथे 2 दिवस उपचारानंतर अखेर शनिवार 16 ऑक्टो. ला निखीलचा मृत्यू झाला. निखिलच्या मृतदेहाचा नागपूर येथे पोस्टमार्टेम झाल्यानंतर वणीत आणला जाणार आहे. दुपार नंतर वणी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृतकच्या मागे आजी, आजोबा, (नाना-नानी), वडील, दोन बहीण, काका, काकी असा मोठा आप्त परिवार आहे.

हे देखील वाचा:

अखेर विदर्भा नदीत बेपत्ता झालेल्या इसमाचा आढळला मृतदेह

थोडक्यात महत्त्वाच्या क्राईम अपडेट

चांगल्या खरीप पिकांचा केला परतीच्या पावसाने सत्यानास

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.