भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव नगरपंचायतच्या नव्याने आरक्षणाची सोडत आज दि. 12 नोव्हेंबरला काढण्यात आली. नगरपंचायतच्या हॉलमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या अध्यक्षतेखाली हे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये काही प्रभाग महिलांकरिता आरक्षित निघाल्याने ज्यांनी मागील आरक्षणापासून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. त्यामुळे या आरक्षणाकडे कभी खुशी कभी गम या नजरेतून अनेकजण पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नगरपंचायत निवडणुकांचे नव्याने आरक्षण येथील यामध्ये यामध्ये प्रभाग क्र. 1 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्र. 2 सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण, प्रभाग 4 सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 नामाप्र महिला, प्रभाग 6 नामाप्र महिला, प्रभाग 7 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग 8 व 9 सर्वसाधारण, प्रभाग 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग 11 अनुसूचित जाती महिला, प्रभाग 12 अनुसूचित जाती, प्रभाग 13 अनुसूचित जमाती, प्रभाग 14 नामाप्र, प्रभाग 15 अनुसूचित जमाती महिला, तसेच प्रभाग 16 व 17 सर्वसाधारण अशाप्रकारे नव्याने आरक्षण सोडत एका शाळकरी मुलीच्या हाताने काढण्यात आली.
या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे गणित बिघडले असून यातील अनेकांनी काही महिण्याआधीपासूनच तयारी चालवलेली होती. यातील अनेकांचा मोठा हिरमोड झाल्याने राजकीय पुनर्वसन त्यांचे पुढारी कशाप्रकारे करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.