शहीद शेतकरी कलशाचे वणीत स्वागत

माकप, किसान सभा व वंचितचा सहभाग

जब्बार चीनी, वणी: शहीद शेतकरी अस्थीकलशाचे बुधवारी वणीत आगमन झाले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांद्वारा कलशयात्रेचे स्वागत करण्यात आले. सकाळी पाटणबोरी येथे नांदेड जिल्ह्यातून कलश यात्रा पोहोचली. त्यानंतर ही यात्रा वणी येथे पोहोचली. यावेळी छ. शिवाजी चौकामध्ये अभिवाद सभा घेण्यात आली. त्यानंतर ही यात्रा मारेगाव येथे पोहोचली.

या तीनही ठिकाणी झालेल्या स्वागत व अभिवादन सभेत अस्थीकलश यात्रेत सोबत असलेले किसान सभेचे कॉ. जितेंद्र चोपडे, माकपचे कॉ. शंकरराव दानव, कॉ. दिलीप परचाके, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. चंद्रशेखर सिडाम, वंचितचे दिलीप भोयर, मंगल तेलंग, मिलिंद पाटील, लढा शेतकरी हक्काचे रुद्रा कुचनकर, शेतकरी संघटनेचे ओमदेव कनाके, सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक साठे यांनी मार्गदर्शन केले.

या यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या शहीद शेतकरी अस्थीकलश यात्रेला यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड किसन मोहूरले, खुशालराव सोयाम, रामभाऊ जिड्डेवार, रवी जाधव, संदीप सुरपाम, प्रशांत लसंते, भाऊराव टेकाम, उरकुडा गेडाम, सुरेखा बिरकुलवर, गजानन ताकसांडे, कवडू चांदेकर, सुधाकर सोनटक्के, नंदू बोबडे, शंकर भगत, सुदर्शन टेकाम, सुरेंद्र आडे, अशोक ढोले, संजय वालकोंडे, आदींनी परिश्रम घेतले.

शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका केंद्रीय मंत्र्याच्या गाडीने चिरडले. घन घटनेत चार शेतकरी व एका पत्रकाराचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा अधिक शेतकऱी गंभीर जखमी झाले होते. शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत निंदणीय घटना असून सध्या याचा देशभर निषेध केला जात आहे. या अनुषंगाने शहीद शेतकरी अस्थीकलश यात्रेचे आयोजन व अभिवादन सभेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. 

शहीद शेतकऱ्यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रव्यापी अस्थीकलश अभिवादन यात्रा 27 ऑक्टोबरला पुणे येथील क्रांतीज्योती महात्मा फुले वाड्यातून निघाली आहे. 18 नोव्हेंबरला मुंबई येथे हुतात्मा चौकात या अभिवादन कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

हे देखील वाचा:

दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…

प्रवीण खानझोडे यांचा शिवसेनेत प्रवेश

Comments are closed.