वणीत संविधान दिन साजरा, विविध उपक्रमाचे आयोजन
समाज उन्नतीचा मार्ग म्हणजे संविधान: डॉ विकास जूनगरी
विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी वणीत ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. विविध कॉलेजमध्ये, शाळेमध्ये तसेच विविध पक्ष आणि संघटनाद्वारे विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात आला. संविधान चौकात वंचित आघाडीतर्फे संविधान निर्मात्यांना अभिवादन कऱण्यात आले. राजूर येथे दौडचे आयोजन करण्यात आले होते. जनता शाळेमध्ये संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन करण्यात आले. तर नुरजहां बेगम महाविद्यालयात लो टी महाविद्यालयाचे डॉ. विकास जूनगरी यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ विकास जुनगरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना संविधान प्रदीर्घ परिश्रमाचे फळ असून संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. समाजाची सर्वोतोपरी उन्नती आपल्याला बघायला मिळते यामध्ये संविधानाचे योगदान विसरून जमणार नाही. एक उत्कृष्ट राजकीय यंत्रणा निर्माण करून अफाट लोकसंख्येला एका सूत्रात बांधून ठेवण्याचे महत्तम कार्य आपल्या संविधानाने पार पाडले आहे.
सदर कार्यक्रमाला संस्थेच्या डॉ राणानुर सिद्धीकी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित वनकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा प्रदीप झाडे यांनी केलं. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उपस्थित दर्शवून संविधानाचं मार्मिकत्व लक्षात घेतले.
जनता विद्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन
वणीतील जनता विद्यालय येथे सकाळी 7.30 वाजता संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले व राष्ट्रीय एकत्मतेची शपथ घेतली. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश खंडाळकर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रमेश बेहरे व आभार विवेकानंद मांडवकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.