वणीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

मेनबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून बाबासाहेबांना मानवंदना

जितेंद्र कोठारी, वणी: महापरिनिर्वाण दिनानिमित्त वणीत ठिकाठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचशील नगर, भीमनगर, सम्राट अशोक नगर, दामले ले आऊट, रंगनाथ नगर विठ्ठलवाडी, शाळा क्रमांक 7 इत्यादी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. याशिवाय विविध पक्षांतर्फेही बाबासाहेबांना वंदन करण्यात आले.

सकाळी 9.30 वाजता शहरातील आंबेडकर चौक येथील पुतळ्याला मेनबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी त्रिशरन, पंचशील व बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी वणीचे ठाणेदार शाम सोनट्टके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन रमेश तेलंग यांनी केले. तर दुपारी विविध पक्षांतर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याला विविध पक्षाच्या नेत्यांनी हार अर्पन करून अभिवादन केले.

विठ्ठलवाडी येथे अभिवादन
विठ्ठल वाडी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ महापरिनिर्वाणदिना निमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन वणी व मध्य रेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रेल्वे कॉलनी, विठ्ठलवाडी व गौरकार कॉलनी येथील रहिवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगरपरिषद शाळा क्र.7 मध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी श्रेयस देवाळकर या विद्यार्थ्यांने मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सिंधू गोवरदीपे, मंगला पेंदोर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक वसंत गोरे यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक चंदू परेकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय चव्हाण यांनी केले तर मंगला पेंदोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस
शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेपैकी निबंध स्पर्धेतील नितीन बर्वे, पूनम निखाडे, तन्मय निंबाळकर यांना चित्रकला स्पर्धेतील पुष्पक कांबळे, वैष्णवी बघेल, संस्कार घाटे, कनिष्क खामनकर यांना व सामान्य ज्ञान स्पर्धेतील हंसिका डहाके, अनघा दोडके, पुष्पक कांबळे, अदिती मेश्राम या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

हे देखील वाचा:

शेतकऱ्यांनो सावधान ..! चोरट्यांची नजर आता पांढऱ्या सोन्यावर

मारेगाव नगर पंचायत निवडणूक: नेत्याचा नेम करेल कोणाचा गेम?

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.