शेतकऱ्यांनो सावधान ..! चोरट्यांची नजर आता पांढऱ्या सोन्यावर

नांदेपेरा येथे बंड्यातून 20 क्विंटल कापूस लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: आपल्या शेतात दिवसरात्र घाम गाळून पिकविलेले शेतमालही आता सुरक्षित राहिले नाही. शेतातील पाण्याची मोटर, केबल, स्टार्टर व शेतीपयोगी अवजारांची चोरीनंतर चोरट्यांची नजर आता शेतमालाकडे लागली आहे. वणी तालुक्यातील अनेक गावात शेतातून सोयाबीन चोरीच्या घटना घडत असताना नांदेपेरा येथील एका शेतकऱ्याच्या बंड्यातून चक्क 20 क्विंटल कापूस चोरट्यानी लंपास केल्याची घटना रविवार 5 डिसेंम्बर रोजी उघडकीस आली. कापूस चोरीबाबत शेतकऱ्यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र घटनेच्या दोन दिवसानंतरही गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याची माहिती आहे.

तालुक्यातील नांदेपेरा येथील शेतकरी रवी जैस्वाल यांनी कापूस वेचणीनंतर तब्बल 40 क्विंटल कापूस बंड्यात साठवून ठेवला होता.
रविवार 5 डिसेंम्बर रोजी सकाळी जैस्वाल यांच्या शेतातील सालगडी शेतात पोहचला असता त्याला बंड्यातुन कापसाची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ शेतमालक रवी जैस्वाल याना माहिती दिली.

रवी जैस्वाल यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्द तक्रार दिली. तक्रारीवरून पीएसआय शिवाजी टिपूर्णे यांनी घटनास्थळ भेट देऊन पंचनामा केला. कापूस चोरट्यानी पिकअप समकक्ष वाहनांमध्ये अंदाजे 20 क्विंटल कापूस चोरून नेल्याचे अंदाज पोलिसांनी बांधला आहे. वाहनांच्या शोधात पोलिसांनी नांदेपेरा मार्गावरील स्वर्णलीला शाळा परिसरात सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र रात्रीच्या काळोख्यात सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट नसल्यामुळे काही मदत मिळाली नाही.

1.5 लाखांचे नुकसान – शेतमालक
शेतातील बंड्यामधून अंदाजे 20 क्विंटल कापूस चोरी गेल्याबाबत रविवार 5 डिसेंम्बर रोजी सकाळी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र 36 तासानंतरही पोलिसांनी चोरीची एफआयआर दाखल केलेली नाही. 20 क्विंटल कापूस चोरीमुळे माझे तब्बल 1.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तपास अधिकारी यांना विचारणा केली असता तपास सुरु असल्याचे सांगत आहे.
– रवी जैस्वाल, शेतकरी नांदेपेरा

चोरट्यानी कापूस भरलेले वाहन कोणत्या दिशेने नेले. कापूस कुठे विकले का ? याबाबत पोलीस तपास करीत आहे. मात्र शेतकऱ्यांनी तक्रार देऊन दोन दिवस उलटले असता अद्याप पोलीस डायरीवर गुन्हा नोंद करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तक्रार देऊनही अज्ञात चोरट्याविरुद्द गुन्हा दाखल का करण्यात आला नाही. याबाबत तपास अधिकारी काहीही सांगायला तयार नाही.

हे देखील वाचा:

रंगारीपुरा येथे एका घरी लागली भीषण आग

मारेगाव नगर पंचायत निवडणूक: नेत्याचा नेम करेल कोणाचा गेम?

Comments are closed.