लग्नाच्या आमिषाने आधी शरीरसंबंध, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ

प्रेमात दगाबाजी करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: लग्न करण्याची थाप मारुन एका उच्चशिक्षीत तरुणीशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या झरी तालुक्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने पाटण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुलाब लक्ष्मण मेश्राम (26) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा रेल्वेचा कर्मचारी असून घटनेनंतर फरार असल्याची माहिती पाटण ठाणेदार सपोनि संगीता हेलोंडे यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी तरुणी उच्च शिक्षित असून पुणे येथे नौकरी करीत होती. आरोपीसोबत तरुणीची मागील 4 वर्षांपासून ओळख होती. सण 2020 मध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यामुळे तरुणी पुणे येथून परत आपल्या गावी आली. आरोपी यांनी पीडितेसोबत लग्न करण्याचा भूलथापा देऊन अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान 24 नोव्हेंबर 2021 रोजी आरोपी यांनी तरुणीला लवकरच लग्न करू, असे आमिष दाखवून पुन्हा दुष्कर्म केले.

प्रियकराने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून तरुणीचे कुटुंबीय लग्नाच्या बोलणीसाठी गुलाब मेश्राम याचे घरी गेले. मात्र तेव्हा आरोपी यांनी दिलेल्या शब्दातून माघार घेत तरुणीसोबत लग्न करण्यास दिले. त्यामुळे संतप्त तरुणीने सोमवार 13 डिसेंम्बर रोजी प्रियकर गुलाब लक्ष्मण मेश्राम, रा. खापरी, ता. झरीजामणी विरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पाटण पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 376, 376 (2) (N), 417 भादवीनुसार गुन्हा दाखल केले. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला असून पाटण पोलीस शोध घेत आहे. पुढील तपास सपोनि संगीता हेलोंडे करीत आहे.

हे देखील वाचा:

मैत्रिणीनेच केला विश्वासघात, दुष्कर्मासाठी आरोपीला दिली साथ

नायगाव जवळ अपघात, एक जागीच ठार, तर एक गंभीर

Comments are closed.