मैत्रिणीनेच केला विश्वासघात, दुष्कर्मासाठी आरोपीला दिली साथ

अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये अत्याचार, आरोपीसह मदत करणा-या पीडिताच्या मैत्रीणवर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: एका अल्पवयीन मुलीने मैत्रीण असलेल्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर मित्राकडून बलात्कार करायला लावल्याची धक्कादायक घटना रविवार 12 डिसेंम्बर रोजी उघडकीस आली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी आणि त्याला सहकार्य करणारी अल्पवयीन मुलीवर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सुनील टेकाम (25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. झरी तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार झरी तालुक्यातील एका गावात पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडिलांसोबत राहते. शुक्रवार 10 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान पीडिताच्या मैत्रिणीने शौचास जाण्याच्या बहाणा करून पीडितेला सोबत नेले. मात्र शौचास न जाता तिने तिला गावातीलच सुनील टेकाम याच्या घरी नेले. मुलीला आरोपीच्या हवाली करुन तिची मैत्रिण परत घरी निघून गेली. तर आरोपी सुनील टेकाम यांनी पीडितेचा हात धरून बळजबरीने घरामागे असलेल्या बाथरूममध्ये ओढत नेले. आरोपीने पीडितेसोबत बळजबरीने दुष्कर्म करून घराकडे जाण्यास सांगितले.

दुसरीकडे शौचास गेलेली मुलगी बराच वेळ होऊन परत आली नसल्यामुळे चिंतीत मुलीचे आई वडील मुलीचा शोध घेण्यासाठी गावात फिरत होते. दरम्यान सुनील टेकाम यांच्या घरातील बाथरूम जवळ मुलगी दिसून आली. आई वडील व मामा यांनी विचारणा केली असता पीडित मुलींनी सर्व हकीकत सांगितली. पीडित अल्पवयीन मुलीची मनस्थिती ठीक नसल्यामुळे कुटुंबीयांनी घटनेच्या तिसऱ्या दिवशी रविवार 12 डिसेंम्बर रोजी मुकुटबन पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदवली.

दुष्कर्म पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील टेकाम विरुद्ध भादंविच्या कलम 363, 376, 506, 4 आणि बालकांचे लैंगिक शोषण अधिनियम (पॉक्सो) अनव्ये गुन्हा दाखल केला. तर गुन्हेत सहकार्य केल्या प्रकरणी पीडितेचा मैत्रिणीविरुद्ध भादंविच्या कलम 417 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले. आरोपी सुनील टेकाम यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि अजित जाधव करीत आहे.

हे देखील वाचा:

नायगाव जवळ अपघात, एक जागीच ठार, तर एक गंभीर

निवडणुकीआधी राजकीय उलथापालथ ! डॉ. लोढा काँग्रेसच्या वाटेवर?

Comments are closed.