रेती तस्करांच्या शिरपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

वारगाव परिसरात रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना ट्रॅक्टर ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: मंगळवार 14 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी वारगाव परिसरातून रेती तस्करी करणारा एक ट्रॅक्टर पकडला होता. या कारवाईत 2 जणांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्या दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी 14 डिसेंबर रात्रीच्या सुमारास शिरपूर पोलिसांना मिळाली की, वारगाव येथून काही जण रेतीची अवैध वाहतूक करीत आहे. माहितीवरून शिरपूर पोलिसांनी वारगाव येथे धाड टाकून एक ट्रॅक्टर क्रमांक MH 29 AD 8855 ज्यामध्ये 2 ब्रास रेती होती व चालक गोमाजी श्रीराम तावडे रा. वारगाव व मालक धनराज साळवे यांना अटक करीत ट्रॅक्टर जप्त केले.

यांच्याकडून एकूण 5 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करून दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदर कारवाई ठाणेदार गजानन करेवाड, पोऊनी राम कांडुरे, सुगत दिवेकर, प्रमोद जुजूनकर चालक अभिजित कोषटवार यांनी केली.

हे देखील वाचा:

अखेर बुरांडा-खापरी रस्त्याच्या कामाला सुरूवात

डॉ. रसिका अलोणे झाली आंतरराष्ट्रीय योगा ट्रेनर

Comments are closed.