83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास
83 सिनेमा रिलिज, बघा क्रिकेट व वर्ल्डकपचा थरार
बहुगुणी डेस्क, वणी: 1983 चा ऐतिहासिक वर्ल्ड कप जुन्या पिढीतील अनेकांनी बघितला असेल. आजच्या पिढीने याबाबत फक्त ऐकले आहे. कुठेही शर्यतीत नसताना किंवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना धडाकेबाज कामगिरी करत हा वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने जिंकून इतिसात रचला होता. यातील एक सामन्यात तर भारताचा डाव गडगडला असताना कपिल देव यांनी 175 धावांची धुवाधार बॅटिंग करून खळबळ उडवून दिली होती. दुर्दैवाने त्या दिवशी कॅमेरामनचा संप असल्याने या सामन्याचे व्हिडीओ शुटिंग न झाल्याने ही खेळी कुणालाही बघता आली नाही. मात्र आता हा सामना आणि वर्ल्ड कपचा हा संपूर्ण थरार आपल्याला सिनेमा गृहात बघता येणार आहे. आज 83 हा सिनेमा रिलिज होत आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीअस वातावरणात संपूर्ण कुटुंबासह आपल्याला या सिनेमाचा आनंद लुटता येणार आहे.
या सिनेमाने विश्वचषकातल्या आपल्या त्या प्रवासातील प्रत्येक क्षण जिवंत केला आहे. कपिल देव यांचा नटराज शॉट, व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा मागे धावत पकडलेला तो ऐतिहासिक झेल, इंग्लंडविरुद्धचा सामना संपायच्या आधीच मैदानात घुसलेले भारतीय चाहते, त्यावेळी संदीप पाटील यांच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू हे सगळं तुम्हाला त्या काळात घेऊन जाणार आहे. पण त्यातही दिग्दर्शक कबिर खान यांनी एक सरप्राईज दिलंय ते म्हणजे अनेक ठिकाणी खऱ्या मॅचमधली दृश्यं पेरली आहेत. त्यामुळे त्या वर्ल्ड कपचा संपूर्ण इतिहासच आपल्यासमोर या सिनेमाच्या माध्यमातून बघता येणार आहे.
या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगने साकारली आहे. तर सुनिल गावस्करच्या भूमिकेत ताहीर राज भसीन, यशपाल शर्माच्या भूमिकेत जतीन सरना, मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम, रवि शास्त्रीच्या भूमिकेत धैर्य करवा, के श्रीकांत यांच्या भूमिकेत जिवा, मदन लाल यांच्या भूमिकेत हार्डि सिंधू, दिलिप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे तर टीम मॅनेजर पीआर मानसिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी आहे. तर सिनेमाचे दिग्दर्शन कबिर खान यांनी केले आहे.
कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते (येथे क्लिक करा). व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
पेटीएम बुकिंगची लिंक – ttps://paytm.com/movies/wani/tadap-movie-ticket-booking-04q8mdliq
Comments are closed.