पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन कुऱ्हाडीने हल्ला

झरी तालुक्यातील माथार्जुन येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी:   पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून एका तरुणाला कुर्‍हाडीने मारहाण करण्यात आली. पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत माथार्जुन येथे शुक्रवार 21 जानेवारी रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत तरुणाच्या मानेवर व कानाजवळ गंभीर दुखापत झाली. जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन हल्लेखोर विरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

माहितीनुसार तक्रारकर्ता अरविंद रामु आत्राम (22) , रा. माथार्जुन, ता. झरी हा तरुण  शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुमारास गावातील एका पान सेंटरवर खर्रा आणण्याकरिता गेला होता. दरम्यान सुनील भीमराव टेकाम तिथे आला व तू माझ्या पत्नीसोबत संबंध कशाला ठेवते. असा वाद घालून हातात असलेल्या कुर्‍हाडीने अरविंदवर हल्ला चढविला. 

अचानक झालेल्या हल्ल्यात अरविंदच्या मानेवर तसेच कानाजवळ गंभीर जखम झाले. याबाबत जखमी अरविंद आत्राम यांनी पाटण पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुनील भीमराव टेकाम (29) रा. माथार्जुन, ता. झरी  विरुद्द कलम 324 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सपोनि संगीता हेलोंडे करीत आहे. 

 

Comments are closed.