चिंचमंडळ येथे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

अमर जवानची रांगोळीतून प्रतिकृती रेखाटण्यात आली

तालुका प्रतिनिधी, मारेगाव: १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस समस्त भारतवासी करीता काळा दिवस होता. याच दिवशी काश्मीर मधील पुलवामा येथे आपले कर्तव्य बजावून परत येणाऱ्या भारतीय CRPF च्या ताफ्यावर अचानक दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात ४० वीर जवान शहिद झालेत. त्या वीर अमर जवानांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता चिंचमंडळ येथील ग्रामस्थांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी अमर जवानची रांगोळीतून प्रतिकृती रेखाटून असंख्य मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आल्या. शहीद वीर जवानांना २ मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “वीर जवान अमर रहे” व “भारत माता की जय” या घोषणेद्वारे वीर शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीताने श्रद्धांजली कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या श्रद्धांजली कार्यक्रमाला ग्रामवासी, बहुसंख्य युवक व बालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन गंभीर कवाडे यांनी केले. श्रद्धांजली कार्यक्रमास नितेश राऊत, अनिकेत झाडे,वासू विखनकर वैभव सोनटक्के (ग्रा. पं. सदस्य), शुभम पालकर, प्रवीण मोरे, सुमित दानव, सुहास दानव, गणेश क्षिरसागर व इतर युवकांनी सहकार्य केले.

Comments are closed.